भरतीची घोषणा आणि प्रक्रिया
Maharashtra Anganwadi Bharti 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंर्तगत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण, आदिवासी, नागरी प्रकल्पातील एकूण १४,६९० अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे.
जिल्ह्यातील ९३२ मिनी अंगणवाड्यांपैकी ७२९ अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर, प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये मदतनीस भरल्या जातील. उर्वरित अंगणवाड्यांमध्ये १०० मदतनीस आणि २०७ सेविकांची पदे रिक्त आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची भरती होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की, राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची १४,६९० रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. त्यांनी सांगितले की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पांतील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये १३,९०७ पदे रिक्त आहेत. या सर्व १४,६९० पदांसाठी नवीन जाहिराती लवकरच प्रकाशित केल्या जाणार आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या कार्यरत आहेत, ज्यामध्ये सुमारे सव्वालाख विद्यार्थी शिकत आहेत. या अंगणवाड्यांपैकी तीन हजार १५३ मोठ्या अंगणवाड्या आहेत, ज्यांना स्वतंत्र इमारत आहे आणि त्याठिकाणी एक सेविका व मदतनीस नेमले जातात. उर्वरित ९२३ मिनी अंगणवाड्यांमध्ये केवळ एक सेविका कार्यरत असते.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची कविता सादर करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनी अंगणवाडी सेविकांची पदे लवकरच भरली जातील अशी घोषणा केली. अजित पवार यांनी विधानसभेत 2024-25 या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, महाराष्ट्रात येत्या काळात 17 हजार 471 पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. तसेच गृह (पोलीस) विभागासाठी 2 हजार 237 कोटी रुपये, गृह (उत्पादन शुल्क) विभागासाठी 153 कोटी रुपये आणि विधी व न्याय विभागासाठी 759 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदेही लवकरच भरली जातील अशीही घोषणा त्यांनी केली.Maharashtra Anganwadi Bharti 2024
पदासाठी आवश्यक पात्रता
अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्रता आणि इतर अटी खालीलप्रमाणे आहेत:
- शैक्षणिक पात्रता: इयत्ता १२ वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे (विधवा महिलांसाठी कमाल वय ४० वर्षे)
- इतर अटी: फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
How To Apply For Maharashtra Anganwadi Notification 2024
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जाच्या सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखेआधी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयांत पाठवावे. अर्ज अपूर्ण असल्यास तो अपात्र ठरविण्यात येईल.Maharashtra Anganwadi Bharti 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता
राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील अर्ज पाठवण्याचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत:
जिल्हा | अर्ज पाठवण्याचा पत्ता |
---|---|
वाशीम आणि अकोला | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम |
सातारा | बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा पश्चिम |
बुलढाणा | एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बुलढाणा |
अहमदनगर | एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, अहमदनगर |
मुंबई | बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम, मुंबई |
Maharashtra Anganwadi Bharti 2024
वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस पदासाठी वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहे:
- वेतन: रु. ५,५००/- प्रति महिना
इतर महत्वपूर्ण भरती
- कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदांची भरती: २००६ रिक्त जागा
- “ग्रामीण डाक सेवक” पदांची भरती: ४४,२२८ रिक्त जागा
- पोलीस भरती २०२४: अपेक्षित प्रश्नसंच सोडवा आणि मोफत टेस्ट सिरीज
- SSC MTS ८३२६ भरती: १० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
- होमगार्ड भरती: सुमारे ९५०० पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
अधिक माहिती आणि अपडेट्स
भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप डाउनलोड करा आणि नियमित अपडेट्स मिळवा. अन्य सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज Maharashtra360.com ला भेट द्या.
Educational Qualification For Maharashtra Anganwadi Recruitment 2024
अंगणवाडी मदतनीस पदासाठी आवश्यक पात्रता
पात्रता | तपशील |
---|---|
शैक्षणिक पात्रता | इयत्ता १२ वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | १८ ते ३५ वर्षे (विधवा महिलांसाठी ४० वर्षे) |
इतर अटी | फक्त महिला उमेदवार, मराठी भाषेचे ज्ञान |
Salary Details For Maharashtra Anganwadi Jobs 2024
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
अंगणवाडी मदतनीस | रु. ५,५००/- प्रति महिना |
हे हि वाचा:nabard recruitment 2024 last date: नाबार्ड मध्ये बंपर भरती. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईटला विजीट करा
अशाच नवनवीन बातम्या व माहितीसाठी आपल्या Maharashtra360.com या वेबसाईटला सबस्क्राइब करा.
3 thoughts on “Maharashtra Anganwadi Bharti 2024: अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया – 2024”