BAILGADA SHARYAT: महाराष्ट्रात बैलगाडा क्षेत्र फार पूर्वीपासून चालत आहे. सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वात प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत.BAILGADA SHARYAT
या पारंपरिक खेळाला आता आधुनिक तिची जोड मिळाली आहे . महाराष्ट्रात गावच्या यात्रे जत्रेनिमित्त अनेक भागात बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील विविध भागात विविध प्रकारचे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवडता छंद खेळ म्हणजेच बैलगाडी शर्यत.
महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्राचे विविध प्रकार
१. बैलगाडा शर्यत ( चार बैल ) :
अशा प्रकारची शर्यत पुणे आणि नगर भागात प्रामुख्याने खेळवली जाते.ज्यात चार बैलांचा समावेश असतो.शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास 400 वर्षांची जुनी परंपरा आहे.हा एकमेव शर्यतीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चालक बैलगाडी हाकत नाही.या बैलगाडी शर्यत प्रकारात “घाटाचा राजा” असा किताब देखील दिला जातो.
2. छकडी शर्यत :
बैलगाडा शर्यतीच्या छकडी शर्यत हा प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे.हा अत्यंत चुरशीचा खेळ प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात खेळला जातो जात एकच वेळी पाच जात एकच वेळी पाच सहा सात आठ किंवा नऊ ते दहा देखील गाड्या सोडल्या जातात.गट सेमी आणि फायनल अशा पद्धतीने ही शर्यत पूर्ण केली जाते.सातारा सांगली पुणे मुंबई सोलापूर या भागात हा खेळ जास्त खेळला जातो.ज्यात साधारण सातशे ते हजार फुट पल्ला असतो.
BAILGADA SHARYAT
3. सेकंद काटा शर्यत :
सेकंद काटा शर्यत ही पुणे भागात जास्त प्रमाणात आयोजित केली जाते.जात साधारण 800 ते 900 फुटाची फाटी असते.जी गाडी कमीत कमी सेकंदात हे अंतर पार करेल ती गाडी त्यात विजयी होते.पुणे भागात विविध जत्रांना या शर्यतीचे आयोजन केले जाते.
4. घोडा बैल शर्यत :
घोडा बैल शर्यत हा प्रकार प्रामुख्याने नाशिक भागामध्ये खेळला जातो.ज्यात एक बैल आणि घोडा जुंपले जातात.ज्यात फक्त दोनच बैलगाड्यांचा समावेश असतो.साधारण 800 ते 1200 फूट अंतर जी घोडा आणि बैलगाडी प्रथम पारखरे प्रथम पारखरे ती बैलगाडी या खेळात विजयी होते.BAILGADA SHARYAT
5.लाकूड ओढण्याची शर्यत :
कोल्हापूर इचलकरंजी या भागात या शर्यती जास्त प्रमाणात खेळवल्या जातात.जात बैल लाकूड ओढत काही अंतर पार करतो. लाकडाचे वजन 200 ते 400 किलो पर्यंत असते.
6. आरत परत शर्यत :
आरद परत शर्यत ही कोल्हापूर सांगली या भागात जास्त प्रमाणावर खेळवली जाते.ज्यात बैलांना साधारण पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करायचे असते.यात जी बैलगाडी सर्वप्रथम ते अंतर पार करेल ती विजयी होते.
Bailgada Sharyat Bio In Marathi
7. बिन जोड शर्यत :
रायगड ठाणे मुंबई या भागात बिन जोड शर्यती जास्त प्रमाणात खेळवल्या जातात.दोन बैल जोड्या सोबतच सोडल्या जातात त्यात जी बैल जोडी प्रथम अंतर पार करेल ती बैलजोडी विजय ठरवली जाते.अंतिम रेषेवर दोरा बांधला जातो तो दोरा जी बैलजोडी पहिल्यांदा पार करेल अशी बैलजोडी विजयी ठरते.BAILGADA SHARYAT
8. चिखल गुट्टा:
ही शर्यत कोल्हापूर मधील काही भागात तसेच कोकण भागात खेळवली जाते.ज्यात 500 फूट लांब एक चर खोदली जाते.जात काही प्रमाणात चिखल आणी पाणी असते. अशा चिखलातून ती बैलजोडी पळवली जाते.जात त्या बैलजोडीचा ड्रायव्हर हा एका लाकडाच्या गुट्ट्यावर दोरी बांधलेली असते त्यावर उभा राहून बैल जोडी हाकलत असतो .
9. किनारा शर्यत :
हा शर्यत प्रकार कोकणच्या समुद्र किनारपट्टीवर खेळवला जातो.कोकणात बैलगाडींचे शर्यतीचे ट्रॅक बनवणं भौगोलिक दृष्ट्या थोडस अवघडच आहे.त्यामुळे समुद्रकिनारी मोकळी जागा पाहून त्या रेतीवर अशा शर्यतींचे आयोजन केले जाते. सर्व बैलगाड्या एकत्र सोडल्या जातात त्यात जी गाडी पुढे राहील ती गाडी विजयी ठरते.BAILGADA SHARYAT Prakar
Bailgada Sharyat Photo
10. शंकर पट :
उत्तर महाराष्ट्रात या शर्यतींचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते .साधारण 500 ते 600 फूट अंतर ट्रॅक चे असते.ज्या शर्यतीमध्ये ऑटोमॅटिक सेकंड काटा जोडलेला असतो.जी बैल जोडी हे अंतर सर्वात कमी सेकंदात पार करेल.ती बैल जोडी या शंकरपटामध्ये विजयी ठरवली जाते.
अशा प्रकारे महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते.बैलगाडी शर्यतीचा हा पारंपारिक खेळ अतिशय उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.
हे हि वाचा :
अंगापूर मैदानाची १ क्रमांकाची मानकरी सर्जा व सर्जाची जोडी..!- Bailgada Sharyat 2024
कैलासगड किल्ला मुळशीतील इतिहास, पर्यटन आणि अद्भुत सौंदर्याची ओळख: Kailasgad Fort
सत्याग्रह मोडून काढण्यासाठी लोकांवर गरम पाणी ओतले, ‘मुळशी सत्याग्रह’..!- Mulshi Satyagraha
iphone 16 सीरीज लॉन्च हो गयी। जानिए मॉडल्स,फीचर्स और प्राइस: iphone 16 features and price
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची खरी कारणं काय?Shivaji Maharaj Putla
अशाच नवनवीन बातम्या व माहितीसाठी आपल्या Maharashtra360.com या वेबसाईटला सबस्क्राइब करा.