अजितदादा 2024 ची निवडणूक कुठून लढवणार? शिरूर कि बारामती: Ajit Pawar Vidhansabha

Ajit Pawar Vidhansabha: लोकसभा निवडणुकीनंतर साधारण दोन महिन्यांनी ऑगस्ट महिन्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते, की बारामतीतून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढली आहे आणि जिंकली आहे. देखील त्यामुळे यावेळी बारामती मधून लढण्यास आपल्याला इंटरेस्ट नाही. त्यानंतर तीन ऑक्टोबरला बारामतीतच दादांनी विधान केलं होतं की एक सांगतो मागच्या वेळेस जेवढे आमच्या परिवारातील लोक भेटायला येत होती तेवढे या वेळेस कोणी येणार नाही. उलट मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच काम करायचं आहे. ज्या पद्धतीने काम सुद्धा सुरू आह .मी जसं म्हटलं होतं की मी एकटा पडलोय तसं मी एकटा पडलेलो नाही मला माझ्या सगळ्यांनी सांगितलं आहे.

Ajit Pawar Vidhansabha
Ajit Pawar Vidhansabha

मी ते आज खुल करणार नाही ज्या वेळेस उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस असेल त्यावेळी मी स्पष्टपणे सांगेल त्यामुळे अजित पवार नक्की बारामतीतून लढणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता अजित दादा बारामती मधून लढणार की नाही अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात असताना माध्यमांनी अजित दादा शिरूर हवेली विधानसभेतून उमेदवारीसाठी चाचपणी करत असल्याचं वृत्त छापलं. पण सूत्रांनी हे वृत्त नाकारून अजित दादा बारामती मधूनच लढणार असल्याचं माध्यमांना सांगितलं. याआधी अजित दादा बारामती सोडून कर्जत जामखेड मधून निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं पण शिरूर विधानसभेपुरतं बोलायचं झालं तर खरंच शिरूर विधानसभेत अजित दादांची ताकद आहे का ? आणि खरंच अजित दादा बारामती सोडतील का ? की फक्त अजित दादांनी गुगली टाकली आहे पाहूया.

Ajit Pawar Vidhansabha

अजित पवारांच्या बारामती विधानसभा सोडण्याच्या चर्चा का होत आहेत ते पाहूयात..! तर याचं उत्तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून मिळेल. बारामती लोकसभेची निवडणूक शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेरा पवार अशी झाली. अजित पवारांनी केंद्रीय भाजप नेत्यांच्या सांगण्यावरूनच सुने पवारांना उमेदवारी दिल्याचं बोललं गेलं. या निवडणुकीत सुनेत्रा पवार जरी लढत असल्या तरी सर्व प्रचाराची धुरा अजित दादांवर होती. Ajit Pawar Vidhansabha अजित दादा स्वतः निवडणुकीला उभे राहिल्यासारखे बारामतीत प्रचार करत होते.

Ajit Pawar Vidhansabha
Ajit Pawar Vidhansabha

कारण त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती आणि त्यांना केंद्रातल्या भाजप पक्षश्रेष्ठींपाशी स्वतःची ताकद सिद्ध करायची होती. तेव्हा बारामतीत अनेक ठिकाणी बोलताना अजित दादा आम्ही जो उमेदवार देऊ त्याला विजयी करा नाहीतर उद्या मी विधानसभेला उभा राहणार नाही. मलाही माझे उद्योग आणि प्रपंच पडले आहेत तुम्ही जर मला साथ देणार नसाल तर काय फायदा असं विधान करत होते. पण दादांच्या या बोलण्याचा काहीच फायदा झाला नाही आणि बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे एक लाख 58 हजार मतांनी विजयी झाल्या. सुप्रिया सुळे नुसत्या विजयी झाल्या नाहीत तर त्यांनी बारामती विधानसभेतून 47 हजार मतांचे लीड घेतलं. Ajit Pawar Vidhansabha

बारामती अजित दादांचा गड समजला जात असताना दादांची बारामतीतून झालेली पिछेहाट त्यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात होता. बारामतीने सुनेत्रा पवारांना साथ दिली नाही त्यामुळे दादा बारामती मधून लढणार नाहीत अशा सुरुवातीला चर्चा झाल्या. स्वतः अजित दादांनी मी बारामती मधून लढण्यासइंटरेस्टेड नाही असं विधान केलं होतं. Ajit Pawar Vidhansabha थोडक्यात बारामती लोकसभेत सुने पवारांचा झालेला पराभव अजित दादांना जिव्हारी लागल्यामुळे दादा बारामती विधानसभा लढवणार नसल्याचं बोललं गेलं. शिवाय बारामती मधून शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार हे विधानसभेची तयारी करतात अशात अजित पवार बारामती मधून लढल्यास ही लढाई पुन्हा एकदा घरातच होईल लोक लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे विरोधात लढवणं चूक होतं. अशी कबूली अजित दादांनी वेगवेगळ्या माध्यमांसमोर दिली आहे.

Vidhansabha Election 2024

तर मग विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा घरातच करण्याच्या फंदात अजित दादा पडणार नसल्याचं बोललं जातंय. पण ज्या शिरूर हवेली विधानसभेतून अजित दादा लढणार असल्याचं बोललं जातंय तिथे अजित दादांची ताकद आहे का ? शिरूर विधानसभेची नेमकी राजकीय गणित अजित दादांसाठी अनुकूल आहेत का ? तर ज्या शिरूर विधानसभेसाठी अजित दादा चाचपणी करत असल्याचं वृत्त आहे. त्या शिरूर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. शरद पवार गटाचे अशोक पवार Ajit Pawar Vidhansabha अशोक पवार हे मूळचे अजित दादा गटाचे पण अजित दादांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अशोक पवार मात्र शरद पवारांसोबतच राहिले .

शरद पवार गटाचे अशोक पवार 2009 आणि 2019 साली दोनदा शिरूर विधानसभेतून निवडून आलेत त्यांचं शिरूर विधानसभा क्षेत्रात दोन कारखाने त्यातील एक आहे घोडगंगा सहकारी कारखाना आणि दुसरा आहे. व्यंकटेश कृपा साखर कारखाना शिरूर विधानसभेचा थोडक्यात इतिहास पाहायचा झाला तर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आलटून-पालटून हा मतदारसंघ राष्ट्रवादी आणि भाजपकडे राहिला पण अजित दादा पुणे जिल्हा सांभाळत असल्यामुळे शिरूरची जबाबदारी दादांकडे होती आणि त्यांनी 2009 साली अशोक पवारांना तिकीट दिलं आणि निवडून आणलं अजित दादांचा स्वतःचा असा इथं गट आहे त्यामुळेच दादा इथून लढणार असल्याच्या बातम्या आल्यात अजित पवार शिरूर मधून लढणार असल्याच्या बातमीला लोकसभा निवडणुकीची सुद्धा किनार आहे.Ajit Pawar Vidhansabha

Ajit Pawar Vidhansabha 2024

शिरूर लोकसभेची लढाई शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी झाली होती आढळराव पाटलांचा शिरूर मध्ये प्रचार करताना अजित दादांनी अशोक पवारांवर त्याला साहेबांनी सांगितलंय की पुढच्या वेळेस तूच मंत्री होणार आहेस आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आता मंत्री व्हायला निघालायस पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो अशा शब्दात टीका केली होती अजित दादांचा अशोक पवारांवर वैयक्तिक राग असल्याचं बोललं जातं कारण अजित दादांचा महायुतीत समावेश झाल्यावर अशोक पवार अजित दादांसोबत होते पण दिलीप वळसे पाटलांना मंत्रीपद दिल्यामुळे अशोक पवार नाराज झाले आणि त्यांनी अजित दादांची साथ सोडली असं बोललं जातं त्यामुळे शिरूर विधानसभेत स्वतः अजित दादा लढून अशोक पवारांचा पराभव करणार असल्याचं बोललं जातं त्यात भाजपची पण ताकद अजित दादांना मिळू शकते कारण शिरूर विधानसभेत 20% शहरी वाघ आहे. हा मतदार भाजपचा समजला जातो त्यामुळे दादा इथे उभा राहिल्यावर भाजपची पण ताकद त्यांना मिळू शकते . Ajit Pawar Vidhansabha

Ajit Pawar Vidhansabha
Ajit Pawar Vidhansabha

लोकसभा निवडणुकीत मात्र शिरूर विधानसभेतून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंना 27000 मतांचं लीड मिळालं होतं पण इथे एक गोष्ट नमूद करावी लागेल आणि ती म्हणजे बारामती सारखी अजित दादा यांची ताकद शिरूर विधानसभेत नाही.अजित दादांचा या मतदारसंघात गट आहे पण तो म्हणावा तितका प्रभावी नाही. तसंच अजित दादांकडे प्रभावी असा शिरूर मधून उमेदवार सुद्धा नाहीये भाजपचे प्रदीप कंद इथून प्रभावी उमेदवार समजले जातात. पण सिटिंग जागा राष्ट्रवादीच्या असल्यामुळे भाजपला ही जागा सुटण्याची शक्यता कमी आहे. अर्थात अजित दादांना या सगळ्या गोष्टींचा अंदाज असणार मग प्रश्न आहे अजित दादांनी शिरूर विधानसभेसाठी चाचपणी का केली आहे. Ajit Pawar Vidhansabha

Shirur Vidhansabha

तर शिरूर विधानसभेसाठी उमेदवारीची चाचपणी करून अजित दादांनी गुगली टाकल्याचं बोललं जातंय. कारण बारामती विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार हे तयारी करतात शरद पवार बारामतीत दौरा करताना सध्या योगेंद्र पवारांना सोबत घेऊन फिरतात त्यांचा अप्रत्यक्षपणे योगेंद्र पवारांच्या आमदारकीसाठी प्रोजेक्शन चालू असल्याचं बोललं जातंय अशात योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी काकापुतण्यात लढाई झाल्यास ही लढाई घासून होईल असं बोललं जातंय.

त्यामुळे अजित पवार मी बारामती सोडून लढणार असल्याचं नेहमीच सांगतात अजित दादांनी असं बोलण्यास त्यांच्याबद्दल बारामतीमध्ये सहानुभूती निर्माण होते आणि त्यांचे कार्यकर्ते दादांनी बारामती लढलीच पाहिजे असं बोलतात अशा वेळी लोकसभेच्या वेळी सहानुभूतीची जी खेळी शरद पवारांनी खेळली ती अजित पवार आता खेळू पाहत आहेत. कारण अजित दादांना बारामती मधल्या आपल्या ताकदीचा अंदाज आहे 1990 पासून बारामती विधानसभेतून अजित दादा निवडून येत आहेत अशा वेळी सहानुभूतीची गुगली टाकून अजित पवार बारामतीमध्ये आपला विजय निश्चित करत असल्याचं बोललं जातंय आता यानंतर शरद पवार काय खेळी करतील हे पाहावं लागणार आहे. Ajit Pawar Vidhansabha

तुम्हाला याबद्दल काय वाटतं अजित दादा शिरूर मधून निवडणूक लढवतील की बारामती मधून तुमची मत कमेंट करून नक्की सांगा.


हेहि वाचा :

नागरिकांमध्ये भीती पसरवणारा ड्रोन नक्की असतो तरी काय ? : DRONE

Navratri Colours 2024 Marathi: चला पाहूया नवरात्रीचे रंग 2024

BAILGADA SHARYAT: महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचे प्रकार 2024


अशाच नवनवीन बातम्या व माहितीसाठी आपल्या Maharashtra360.com या वेबसाईटला सबस्क्राइब कराशेजारील बेल आयकॉन चे बटण दाबा.

Leave a Comment