पुणे शहरातील सर्वात सुंदर 5 वॉटर पार्क: Water Park in Pune with Price

Water Park in Pune with Price

Water Park in Pune with Price: मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरांमध्ये बरीच सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. पुण्यात अशी कित्येक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना आपण वर्षभर कधीही भेट देऊ शकतो,परंतु पुण्यामध्ये उन्हाळ्यात भेट देण्यासाठी कोणते ठिकाण उत्तम असेल? हा प्रश्न नेहमी उद्भवत असतो.

जर या ठिकाणच्या वातावरणाचा विचार केला तर पुण्यामध्ये उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी पासून ते मे महिन्यापर्यंतचा असतो. या ठिकाणी उन्हाळ्यातील हवामान हे उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असते. त्यामुळे बऱ्याच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असते.ज्याचा फायदा घेऊन उन्हाळ्याच्या दिवसात बरेच पर्यटक पर्यटनांसाठी बाहेर निघत असतात. पुण्यात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी खास करून वॉटर पार्क्सना पहिली पसंती दिली जाते. या ठिकाणी असलेल्या वॉटर पार्क वर पर्यटकांची मोठी गर्दी असते. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर पुणे शहरातील या वॉटर पार्क वर भेट देऊ शकता. अशातच आज आपण पुणे शहरातील सर्वात सुंदर पाच वॉटर पार्क कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.Water Park in Pune with Price

1.पानशेत वॉटर पार्क (Panshet Water Park)

पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक वॉटर पार्क पैकी एक म्हणून पानशेत वॉटर पार्कची ओळख आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्ले या ठिकाणी पानशेत धरण परिसरामध्ये हे वॉटर पार्क स्थित आहे. तसे तर पानशेत वॉटर पार्क हे पुणे व मुंबईतील पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. कारण या ठिकाणी आपल्याला उत्तम मनोरंजक सेवा अनुभवायला मिळतील. या ठिकाणी आपण काय किंग पोहणे वॉटर स्कूटर स्पीड बोट रायडिंग विंड सफरिंग इत्यादी साहसिक खेळ खेळू शकतो. हे वॉटर पार्क खास करून क्रेजी वॉटर राईड्स आणि वॉटर स्पोर्ट साठी प्रसिद्ध आहे. तसेच अशा विविध जलक्रीटांचा आनंद घेण्यासोबतच येथे आपण निसर्गरम्य हिरवाईने भरलेला परिसरही पाहू शकतो आणि या वॉटर पार्कच्या जवळच खडकवासला हे धरण आहे. या धरणाला आपण सुरुवातीला किंवा परत येतानाही भेट देऊ शकतो.

पानशेत वॉटर पार्क हे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते. ज्या ठिकाणी प्रतिवेळी ती 250 रुपये इतकी फी आकारली जाते .पुणे शहरापासून पानशेत वॉटर पार्क हे 45 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.Water Park in Pune with Price

Water Park in Pune with Price

2.कृष्णाई वॉटर पार्क (Krushnai Water Park)

कृष्णाई वॉटर पार्क हे पुणे शहरातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जे सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरणाच्या मधोमध डोंजेगाव सिंहगड रोडवर वसलेले आहे. जे तब्बल 15 एकर परिसरात पसरलेले आहे .कृष्णाई वॉटर पार्क हे मुख्यतः हिरव्यागार आणि निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेले आहे. या वॉटर पार्क मध्ये आपण पायरेट आयलँड ब्लॅक होल ट्विस्टर फेवपूल क्रेजी क्रूज अक्वा डान्स असे अनेक खेळ खेळू शकतो. त्याचबरोबर या पार्कच्या आत एक गेम झोन देखील आहे जिथे आपण व्हिडिओ गेम देखील खेळू शकतो. यामध्ये बुल राईड आणि डॅशिंग कार सह अनेक खेळ खेळू शकतो. Water Park in Pune with Price

जर तुम्ही लहान मुलांबरोबर या वॉटर पार्कला भेट देणार असाल तर या ठिकाणी लहान मुलांसाठी विविध बोगदे आणि लांब स्लाईड्स डिझाईन केलेले आहेत. ज्याचा पुरेपूर आनंद लहान मुले घेतात. कृष्णाई वॉटर पार्क हे दररोज सकाळी 10 ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते. ज्या ठिकाणी चार फूट उंचीपेक्षा कमी मुलांना 500 रुपये तर प्रौढ व्यक्तींना 700 रुपये इतकी फी आकारली जाते. सुट्टीच्या दिवसात हे दर वेगळे असू शकतात पुणे शहरापासून कृष्णाई वॉटर पार्क हे 20 km इतक्या अंतरावर आहे.

3.सेंटोसा रिसॉर्ट्स अँड वॉटर पार्क (Sentosa Resorts & Water Park)

सेंटोसा रिसॉर्ट्स अँड वॉटर पार्क हे पुणे शहराजवळील एक सुंदर आणि आकर्षक उद्यान आहे. जे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रावे जवळ बसलेले आहे. ज्या ठिकाणी आपल्याला अनेक स्लाईड्स आणि व्ह्यू पूलचा आनंद घेता येतो . त्याचबरोबर सेंटोसाचा वॉटर पार्क मधील मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी केला जाणारा रेन डान्स. जिथे डीजे गाण्यावर डान्स करून फुल एन्जॉय करता येतो. तसेच लहान मुलांसाठी या वॉटर पार्क मध्ये एक वेगळा पूल देखील तयार केलेला आहे. जेणेकरून लहान मुलांनाही अशा खेळांचा आनंद घेता येईल.Water Park in Pune with Price

सेंटोसा वॉटर पार्क मध्ये ट्यूब ट्विस्टर स्लाईड्स वॉटर प्ले सिस्टीम मॅजिकल मॅट स्लाईड्स किडी पूल वेव पूल लाईट्स डीजे सह रेन डान्स लेझर पूल आणि वॉटर हॉल अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. सेंटोसा रिसॉर्ट्स अँड वॉटर पार्क हे दररोज सकाळी 10 ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते. ज्या ठिकाणी चार फूट उंचीपेक्षा कमी मुलांना 500 रुपये तर प्रौढ व्यक्तींना 550 रुपये इतकी फी आकारली जाते. सुट्टीच्या दिवसात हे दर वेगळे असू शकतात. पुणे शहरापासून सेंटोसा रिसॉर्ट्स अँड वॉटर पार्क हे 30 km इतक्या अंतरावर आहे.

4. डायमंड वॉटर पार्क (Diamond Water Park)

डायमंड वॉटर पार्क हे पुण्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक उद्यानांपैकी एक आहे. पुण्यामध्ये उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण ठरू शकेल, हे वॉटर पार्क पुण्यात लोहगाव रोडवर स्थित आहे. डायमंड वॉटर पार्क मध्ये 28 राईड्स आणि नऊ वेगवेगळे पूल्स आहेत. तसेच या ऍडवेंचर पार्क मध्ये झोपरिंग झिप लाईन तिरंदाजी आणि रॉक क्लाइंबिंग यासारख्या क्रियाकल्पांचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर हे उद्यान कार्पोरेट इव्हेंट्स खाजगी पार्टी फंक्शन स्कूल पिकनिक आणि कॉलेज आउटिंग साठी ही सुविधा देते.Water Park in Pune with Price

डायमंड वॉटर पार्क मध्ये वेव्स किड्स प्ले स्टेशन फॅमिली प्लेस स्टेशन रेन डान्स मॅट रेसर सायक्लोन स्क्रीमर मॅट ट्विस्टर लंच पॅड सेरील टनल झिपर फेवफॉल अशा अनेक खेळांचा आनंद घेता येतो. डायमंड वॉटर पार्क हे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते. ज्या ठिकाणी चार फूट उंचीपेक्षा कमी मुलांना 999 रुपये तर प्रौढ व्यक्तींना 1099 रुपये इतकी फी आकारली जाते. सुट्टींच्या दिवसात हे दर वेगळे असू शकतात पुणे शहरापासून डायमंड वॉटर पार्क हे 17 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.Water Park in Pune with Price

5.वेट अँड जॉय वॉटर पार्क (Wet N Joy Water Park)

वेट अँड जॉय वॉटर पार्क हे एक मजेदार उद्यान आहे, ज्या ठिकाणी आपण आपल्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमवेत जाऊ शकतो. जे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मुंडावरे जवळ आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोनावळा या पर्यटन स्थळापासून हे वॉटर पार्क काही अंतरावर आहे.Water Park in Pune with Price त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते तसेच हे ठिकाण पुणे आणि मुंबईच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे या ठिकाणी पुणे-मुंबईतील बरेच पर्यटक येत असतात.

वेट एंजाय वॉटर पार्क मध्ये आपल्याला 25 वेगवेगळ्या प्रकारच्या राईट्स एक्सप्लोर करायला मिळतील. यामध्ये क्रेजी रिवर नाईट मियर फ्री फॉल मास्टर ब्लास्टर लेझी रिवर रेन डान्स रॉयल कॅस्टल हंगामा असे अनेक खेळ खेळता येतील. वेट एंड जॉय वॉटर पार्क हे दररोज सकाळी 10:00 ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते. ज्या ठिकाणी 4 ft उंचीपेक्षा कमी मुलांना ₹999 तर प्रौढ व्यक्तींना ₹1099 इतकी फी आकारली जाते. तर सुट्टींच्या दिवसात हे दर वेगळे असू शकतात. पुणे शहरापासून वेट अँड जॉय हे वॉटर पार्क 52 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.Water Park in Pune with Price

तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात सुंदर पाच वॉटर पार्क बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्ही यापैकी पुण्यातील कोणकोणत्या वॉटर पार्क भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

अशाच नवनवीन बातम्या व माहितीसाठी आपल्या Maharashtra360.com या

हे हि वाचा :

अंगापूर मैदानाची १ क्रमांकाची मानकरी सर्जा व सर्जाची जोडी..!- Bailgada Sharyat 2024

कैलासगड किल्ला मुळशीतील इतिहास, पर्यटन आणि अद्भुत सौंदर्याची ओळख: Kailasgad Fort

सत्याग्रह मोडून काढण्यासाठी लोकांवर गरम पाणी ओतले, ‘मुळशी सत्याग्रह’..!- Mulshi Satyagraha

मद्यधुंद वाहनचालकांवर पोलिसांचे लक्ष, वाढलेले दंड आणि कठोर नियम कलम 185 आणि S 188: drink and drive rules in maharashtra

iphone 16 सीरीज लॉन्च हो गयी। जानिए मॉडल्स,फीचर्स और प्राइस: iphone 16 features and price

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची खरी कारणं काय?Shivaji Maharaj Putla

Leave a Comment